Saturday, 25 April 2020

अन्नदाता सुखी भव

आज पंतप्रधानांना ऐकून थोडेशे लिहावेसे वाटले जी जाणीव तीव्रपणे झाली ती आपल्यासोबत शेअर करीत आहे. देशातील शेतकऱ्यांना अनुदान कश्याला, कर्जमाफी कश्याला, शेतकरी आळशी आहेत आणि बरच कांही बोलणाऱ्या आम्हा पांढरपेशी, नोकरदार, व्यापारी, उद्ययोजक, आजून बराच मोठया वर्गातील लोकांनी विचार  करावा कोरोना मुळे झालेल्या लॉक डाऊन मध्ये कोणतेही काम न करता करोडो लोक पोटभर अन्न खाऊ शकतात ते कोणामुळे?याचे उत्तर आहे शेतकऱ्यांमुळे, त्यांनी पिकवले म्हणून आपल्या ताटात आले आहे. आता तरी शेतकऱ्यांचे मोल कळले असेल. आपल्याला हे कळले पाहिजे तुम्ही आम्ही जे निर्माण करतो ते नक्कीच बहुमोल असेल  मात्र आज या परिस्थितीत हे सिद्ध होते की, केवळ शतकऱ्याने जे निर्माण केले ते अमूल्य आहे. म्हणून मला वाटते शेतकऱ्यांना कर्जमाफी देऊन, अनुदान देऊन समाज अथवा शासन म्हणून आपण त्यांच्यावर उपकार करत नाही तर उलट आपण आपल्याला जेवढे झेपेल तेवढे त्यांचे ऋण फेडतो आहे अशी भावना ठेवली पाहिजे. आज अक्षय तृतीयेच्या या शुभ प्रसंगी जगाचा पोशिंदा सुखी राहो आणि त्याच्या अक्षय निर्मितीतून आपले अक्षय अस्तित्व टिकवून राहील अशी मंगल कामना.

No comments:

Post a Comment