Friday, 28 February 2020

मराठी भाषा गौरव दिन


पी व्ही डी टी महिला शिक्षणशास्त्र महाविद्यालयात मराठी भाषा गौरव दिनानिमित्त "मराठी भाषा जत्रा" या अभिनव उपक्रमाचे आयोजन
 एस एन डी टी महिला विद्यापीठाच्या  पी. व्ही डी. टी महिला शिक्षणशास्त्र महाविद्यालयातील मराठी भाषा शिक्षण मंडळाच्या विद्यार्थिनींनी मराठी भाषेतील अभिजात अस्सल भाषिक ठेवा सर्वांसमोर मांडण्यासाठी सदर कार्यक्रमाचे आयोजन केले होते. या भाषा जत्रेचे उदघाटन महाविद्यालयाच्या प्राचार्य डॉ मीना कुटे यांच्या हस्ते झाले. कार्यक्रमाचे संयोजक डॉ महेश कोलतमे यांच्या मार्गदर्शनाखाली विद्यार्थिनींनी मराठी भाषा जत्रेतून जात्यावरच्या ओव्या, धवळे, अभंग, पोवाडा, भुलाईचे गीते, कृषिगीते, भारुड, गौळण, भूपाळी, लावणी इत्यादी लोकसाहित्याचा  वारसा लोकांसमोर मांडण्याचा प्रयत्न केला तसेच विविध भाषिक खेळ जसे म्हणी ओळखणे, उखाणे पूर्ण करणे, शब्द कोडे, जिभेचे खेळ, वाक्यप्रचार, अलंकार ओळखणे, रस, भाव यांचे खेळ तसेच मराठीच्या बोलींचा परिचय व प्रत्यक्षनुभूती असा विविधांगी समृद्ध असा मराठीचा वारसा कल्पक व  कलात्मक स्वरूपात सादर केला. 
भाषा जत्रेला प्रसिद्ध मराठी  सिनेअभिनेते श्री गिरीश कुलकर्णी यांनी भेट दिली व विविध खेळ खेळून विद्यार्थीनीचे कौतुक केले. 
 तसेच विद्यापीठाच्या मा. कुलगुरू प्रो. शशिकला वंजारी मॅडम, प्रकुलगुरू.  डॉ विष्णू मगरे सर, कुलसचिव डॉ दीपक देशपांडे सर तसेच विद्यापीठाचे विविध अधिकारी, कर्मचारी व विद्यार्थ्यांनी या भाषा जत्रेला भेट देऊन मराठी भाषेचे वैभव अनुभवले आणि विद्यार्थिनींच्या कल्पकतेचे कौतुक केले.या कार्यक्रमाला कांही परदेशी पाहुण्यांनी भेट दिली व मराठी भाषेचा गोडवा अनुभवला.