मित्रानो, आज इंटरनेट मुळे संपुर्ण
जगातील माहिती, ज्ञान, साधने आणि अध्ययन स्रोत सर्वाना सहज पणे उपलब्ध होत आहेत. इंटरनेट
मुळे ज्ञानाधिष्टीत समाजाची जडणघडण होत आहे हे खरे. एखादया संशोधक अभ्यासकाला
इंटरनेट वर एखादे उपयुक्त संशोधन साधन, संसाधन सापडले ते त्याच्यासाठी उपयोगी
ठरणारे आहे मात्र त्याचा वापर कसा करणार? संबंधित निर्मात्याचा केवळ उल्लेख करणे
पुरेशे होईल काय? किंवा त्याची लेखी परवानगी घ्यावी लागेल? त्यासाठी कंही पैसे द्यावे लागतील काय? आपन केलेला उपयोग ही साहित्याची चोरी तर ठरणार नहीं ना? इत्यादी अनेक प्रश्न उभे राहतात. याचे कारण आहे
प्रताधिकार (Copyright)
कायदा. लेखक अथवा
निर्मात्याने त्याच्या सर्जनशील कामाचे कॉपी राइट्स सुरक्षित केले असतील तर त्या
सामग्रीचा मोफत वापर अथवा प्रसार बेकायदेशीर, अनैतिक ठरू शकतो. थोडक्यात प्रताधिकार कायदा काय आहे ते पहु म्हणजे
मुक्त लायसन ची आवश्यकता लक्षात येईल.
मित्रांनो, यूरोपमध्ये १६ व्या शतकात छपाईच्या तंत्राचा विकास झाला. या नवीन तंत्राच्या विकासामुळे
छापील सामग्री कॉपी करणे व हवे तेवढ्या त्याच्या प्रति तयार करणे सोपे झाले आणि
त्या बरोबरच साहित्याची चोरी करणे स्वतःच्या नावाने छापणे इत्यादी अनैतिक
गोष्टींचा सुळसुळाट झाला. परिणामी याला आळा घालण्यासाठी कायदेशीर तरतूद करणे
गरजेचे होते त्यातूनच प्रताधिकार म्हणजेच कॉपीराईट ही संकल्पना विकसित झाली.
सर्वप्रथम इंग्लंड व स्कॉटलंड मध्ये १७१० मध्ये प्रताधिकार कायदा अस्तित्वात आला.
पुढे त्यात वेळोवेळी सुधारणा होऊन त्याचा विस्तार झाला. भारतात भारतीय प्रताधिकार
कायदा १९५७ ला अस्तित्वात आला. तो ब्रिटिश प्रताधिकार कायदा १९११ ला आधार मानून
तयार केला गेला आहे. थोडक्यात काय तर साहित्यिक, कलात्मक शैक्षणिक किंवा
सांगीतिक सर्जनशील कार्य अथवा सामग्री जसे सांगीतिक रचना, व्हिडीओ, ध्वनिमुद्रने, चित्रे, आलेख तक्ते इमरतींचे अथवा बांधकामाचे
आराखडे मूल्यमापनाच्या चाचण्या, मूल्यांकनाची साधने इत्यादींचा वापर, पुनर्वापर, कॉपी करून हवे तेवढया प्रति
तयार करण्याचे सर्व अधिकार त्याच्या निर्मात्याला अथवा लेखकाला मिळाले.
निर्मात्याव्यतिरिक्त इतरांच्या वापरावर कायदेशीर निर्बंध घालण्याच्या व सृजनशील
निर्मिती करणाऱ्या लेखक, निर्माता यांच्या अधिकराचे संरक्षण करण्याच्या धोरणाला
कॉपीराईट असे म्हणता. तंत्रज्ञानाच्या विकासामुळे कॉपी करणे, तिचे इतराना वाटप करणे सहज सोपे
आणि झटपट काम झाले त्यामुळे प्रताधिकाराचे महत्व वाढले. कॉपीराईट मुळे संबंधित
सामग्रीच्या लेखकाला, निर्मात्याला त्याच्या बौद्धिक श्रमाचे व निर्मितीचे श्रेय
मिळणे सोपे झाले परिणामी त्यांच्या कार्याचा मोबदला मिळवणे शक्य झाले.
असे असले तरी, प्रत्येक वेळी वर्गणी अथवा खरेदी सर्वानाच विशेषतः विद्यार्थ्यांना परवडणारी नसते. बऱ्याचदा अध्ययन, अध्यापन व संशोधनासाठी उपयोगी ठरणाऱ्या सर्जनशील लेखन, कलात्मक, संगीतिक रचना, शैक्षणिक साधनसामग्रीचा कायदेशीर वापर करण्यास त्याच्या निर्मात्यांची हरकत नसते; मात्र ते स्पष्ट होण्यासाठी तसेच निर्माता त्याच्या निर्मितीचा किती व कसा वापर काण्यास परवानगी देतोय हे कळण्याचा उपाय नव्हता. ज्या सामुग्री निर्मात्यांना त्यांचे साहित्य इतरांनी शिक्षणासाठी अथवा संशोधनासाठी कोणत्याही पूर्व परवानगीशिवाय व मोफत उपयोगात आणण्यास कांहीच हरकत नसेल, किंवा मर्यादित निर्बंधांसह वापरण्याची परवानगी देण्याची तयारी असेल तर त्या साठीची कायदेशीर व्यवस्था आवश्यक होती त्यातूनच २००२ मध्ये अमेरिकेत क्रिएटिव्ह कॉमन्स (CC) अनुज्ञप्ती संकल्पना अस्तित्वात आली.
क्रिएटिव्ह कॉमन्स (CC) अनुज्ञप्ती ही सार्वजनिक प्रताधिकार परवाण्याचाच एक
प्रकार आहे. या अनुज्ञप्ती मुळे सर्जनशील कामाचा अथवा निर्मितीचा विनामूल्य वापर
तसेच इतरांना वाटप करण्याची परवानगी मिळते. एखाद्या लेखकाला त्याच्या सर्जनशील लेखनाचे अथवा संशोधनात्मक निर्मितीचे इतरांना कोणत्याही निर्बंधांशिवाय अथवा
मर्यादित निर्बंधांसह वाटप करण्याची इच्छा असते तेंव्हा तो या प्रकारच्या (CC) अनुज्ञप्तीचा वापर करतो.
त्यालाच क्रिएटिव्ह कॉमन्स (CC) अनुज्ञप्ती असे म्हणतात. या प्रकारची अनुज्ञप्ती
देताना निर्मात्याने कोणते अधिकार सुरक्षित ठेवले आहेत किंवा कोणते निर्बंध घातले आहेत त्यावरून
त्यांचे पुढील सहा प्रकारात विभाजन करता येते.
मुक्त CC लायसन्स चे प्रकार:
१. CC-BY (Attribution) लायसन:
![]() |
| CC-BY |
या प्रकारच्या लायसन द्वारे लेखक अथवा निर्माता त्याला म्हणजेच मूळ लेखकाला अथवा निर्मात्याला सादर कार्याचे श्रेय देऊन म्हणजेच वापरताना हे काम "----" यांचे आहे असा उल्लेख करून इतर कोणीही सामग्रीची स्वतःच्या गरजेनुसार व संदर्भानुसार पुनर्मांडणी, रीमिक्स, करून वापरण्यास अथवा वाटप करण्यास परवानगी देतो. एवढेच नाही तर मूळ लेखक अथवा निर्माता याला त्याच्या कार्याचे श्रेय देऊन सामग्रीचा शैक्षणिक अथवा व्यवसायिक वापरास सुद्धा परवानगी देतो.
२. CC-BY-SA (Attribution Share Alike) लायसन:
![]() |
| CC-BY-SA |
हा परवाना मुळ लेखक अथवा निर्मात्याला निर्मितीचे श्रेय
देऊन इतरांना सामग्रीचा वापर, रीमिक्स, रुपांतर करण्यास, तिचे वाटप करण्यास एवढेच
नाही तर व्यवसायिक वापर करण्यास सुद्धा परवानगी देतो. मात्र यात अजून एक अट आहे ती
म्हणजे तुम्ही लेखकाला श्रेय देऊन या प्रकारची
परवानगी असलेली सामग्री वापरून नवीन सामग्रीची निर्मिती केली तर त्या नवीन निर्मितीला मूळ सामग्री साठी वापरलेल्या लायसनच्या अटी शर्ती असलेले लायसन वापरने
बंधनकारक आहे. या परवानाची तुलना बर्याचदा
"Copyleft" विनामूल्य आणि मुक्त स्रोत
सॉफ्टवेअर परवान्यांशी केली जाते. वापरले जात असलेल्या समग्रीवर आधारित सर्व नवीन कामे मुळ स्रोताच्या परवान्या समान परवाना
घेतला गेला पाहिजे. हा परवाना व्यवसायिक वापरास अनुमती देतो. विकिपीडियासाठी वापरलेले लायसन अथवा परवाना याच प्रकारचा आहे. अर्थात विकिपीडियामधील सामग्रीचा समावेश करुन तयार झालेली अन्य सामुग्री ही सुद्धा पुढे मुक्त वापरासाठीच राहील व अधिकाधिक लोकांना त्याचा फायदा होईल ही अपेक्षा आहे.
३. CC-BY-ND (Attribution-NoDerivs) लायसन:
![]() |
| CC-BY-ND |
हा परवाना लेखक अथवा निर्मात्याला श्रेय देऊन इतरांना संबंधित स्रोतांचा व्यावसायिक वापरासह कोणत्याही कारणासाठी पुन्हा वापरण्याची परवानगी देतो; मात्र, ते रुपांतरित स्वरूपात इतरांना वाटप केले जाऊ शकत नाही.
४. CC-BY-NC (Attribution-Non Commercial) लायसन:
![]() |
| CC-BY-NC |
![]() |
| CC-BY-NC-SA |
हा परवाना मूळ लेखक अथवा निर्मात्याला त्यांच्या निर्मितीचे
श्रेय देऊन स्रोतांचा वापर, रिमिक्स करण्यास अथवा नवीन पुनर्रचित सामुग्री तयार करण्यास परवानगी देतो मात्र मुळ स्त्रोताच्या परवान्यातील
अटींसहच नवीन निर्मितीचे लायसन घेणे बंधनकारक आहे तसेच त्याच्या व्यावसायिक
वापराची परवानगी यात नसते
६. CC-BY-NC-ND (Attribution-Non Commercial-NoDerivs) लायसन:
![]() |
| CC-BY-NC-ND |
हा
परवाना सामग्रीचा उपयोग करणऱ्यावर जास्तीत जास्त निर्बंध घालतो. इतरांना केवळ सामग्री
डाउनलोड करण्याची अनुमती दिलेली असते. हा परवाना लेखकाला श्रेय देत त्याच्या
नावासह संबंधित स्रोताचे इतरांना वाटप करण्यास अनुमती देतो परंतु वापरकर्ता मुळ
सामग्रीत कोणत्याही प्रकारचे बदल अथवा रिमिक्स करू शकत नाही तसेच यात सामग्रीचा व्यावसायिक वापर करण्यास ही प्रतिबंध आहे
![]() |
| https://creativecommons.org/spectrum-with0/ |
थोडक्यात काय तर तुकाराम महाराजांनी म्हटल्याप्रमाणे
"जे जे आपणासी ठावे। ते ते इतरांशी सांगावे।
शहाणे करुण सोडावे। सकळ जन।।
या उपदेशाजवळ आज जग आलेले आहे व ज्ञानाचा अधिकाधिक लोकांना मुक्त पणे वापर करता यावा या साठी मुक्त अनुज्ञप्ती ची व्यवस्था विकसित झालेली आहे तिचा आपन सर्वांनी मोठ्या मनाने स्वीकार करून आपल्याच संस्कृतीचा वारसा नव्या पद्धतीने पुढे चलवायला हवा असे मला वाटते.

मुक्त शैक्षणिक स्रोतांसाठी क्रिएटिव्ह कॉमन्स (CC) अनुज्ञप्ती by Dr. Mahesh Koltame is licensed under a Creative Commons Attribution-ShareAlike 4.0 International License.









Please give your comments, feedback or feel free to ask any doubt related to subject.
ReplyDeleteखुप उपयुक्त व मोजक्या शब्दात परिपुर्ण माहिती मिळाली.
ReplyDeleteखूप खूप धन्यवाद सर
DeleteNice Sir
ReplyDeleteThanks!
Deleteछान आहे अभ्यासपूर्ण लेख आहे. अभिनंदन सर.
ReplyDeleteThank you very much sir.
DeleteNice Dr Good going
ReplyDeleteThanks Dr..
Deleteखूप छान एम.के.सर अत्यंत महत्त्वपूर्ण आणि महत्वाची माहिती🌸
ReplyDeleteधन्यवाद!
Deleteखुपच छान
ReplyDeleteधन्यवाद!
DeleteNice Sir
ReplyDeleteThank you!
Delete